logo
|
|* *|वैयक्तिक व्‍याज परतावा योजनेच्‍या लाभार्थींना सशर्त हेतू पत्रांची (Letter of Intent) मुदत वाढ करुन मिळण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन पोर्टलवर विनंती करण्याची सुविधा तयार केली आहे. लाभार्थ्यांनी त्यांच्या लॉगिन मध्ये जाऊन सशस्त्र हेतु पत्राची मुदत वाढ करण्याची विनंती करणे.|* *|वसंतराव नाईक वि.जा.व भ.ज.विकास महामंडळांतर्गत सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी नियुक्त करणेबाबत"
आमच्या विषयी

महामंडळाची स्थापना

समाजातील दारिद्र्य रेषेखाली जीवनमान जगणा-या विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातींच्‍या लोकांचा विकास करण्‍याच्‍या दृष्‍टीने महाराष्‍ट्र शासनाने दिनांक ८ फेब्रुवारी, १९८४ रोजी कंपनी कायदा, १९५६ नुसार महामंडळाची स्‍थापना केली आहे.

शासन निर्णय वनाम -१०९९/प्र.क्र.१२६/इमाव-२ दि- १३ जुलै, १९९९ नुसार विशेष मागास प्रवर्गातील जातींना कर्ज पुरवठा करण्‍याकरीता वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळास प्राधिकृत वाहिनी म्‍हणून शासनाने मान्‍यता दिली आहे.

स्थापनेची उद्दिष्टे

विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातीच्‍या समाजातील आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्‍यक्‍तींना सवलतीच्‍या व्‍याज दराने अर्थसहाय्य देऊन त्‍यांच्‍या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्‍नतीकरिता महामंडळाची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

महामंडळाचे अधिकृत व वितरीत भाग भांडवल

वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल रु. २००.०० कोटी असून त्यापैकी मार्च, २०२५ पर्यंत शासनाकडून रु.१९९.८७ कोटी भागभांडवली अंशदान म्हणून प्राप्त झाले आहे. सदर रक्कमेमध्ये शासन कर्जमाफीची रु. ४९.४९ कोटी इतकी रक्कम समाविष्ट आहे.

अ.क्र. वित्तीय वर्ष भागभांडवल (रु. कोटीत)
1१९८३-१९८४०.२०
2१९८४-१९८५०.२०
3१९८५-१९८६०.३०
4१९८६-१९८७०.४५
5१९८७-१९८८०.४५
6१९८८-१९८९०.२९
7१९८९-१९९००.४२
8१९९०-१९९१०.४६
9१९९१-१९९२०.३४
10१९९२-१९९३०.२९
11१९९३-१९९४०.४०
12१९९४-१९९५०.५०
13१९९५-१९९६१.८५
14१९९६-१९९७३.१५
15१९९७-१९९८३.५०
16१९९८-१९९९२.०५
17१९९९-२०००५.१५
18२००१-२००२१.७५
19२००२-२००३०.८०
20२००३-२००४४.००
21२००४-२००५१३.००
22२००५-२००६१०.००
23२००६-२००७५.००
24२००७-२००८५.००
25२००८-२००९३२.००
26२००९-२०१०१२.८०
27२०१०-२०११९.००
28२०११-२०१२१७.९३
29२०१२-२०१३३२.००
30२०१३-२०१४१४.४०
31२०१४-२०१५९.४५
32२०१५-२०१६८.८२
33२०१८-२०१९३.४०
34२०२२-२०२३०.५२
एकूण १९९.८७

उपकंपन्यांचा तपशील

अ.क्र. उपकंपनी शासन निर्णय/दिनांक स्थापना अधिकृत भागभांडवल प्राप्त भागभांडवल अप्राप्त भाग भांडवल
राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (रामोशी समाजाकरीता) शासन निर्णय क्र.महामं २०२३/प्र.क्र.१४/महामंडळे, दि.०९/०८/२०२३ दि.०४/०१/२०२४ रु. 50 कोटी रु. ४.४६ कोटी रु. ५.५४ कोटी
पैलवान कै. मारुती चव्‍हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ (वडार समाजाकरीता) शासन निर्णय क्र.महामं २०२३/प्र.क्र.२२/महामंडळे, दि.०९/०८/२०२३ दि.२०/०१/२०२४ रु. 50 कोटी रु. ४.४६ कोटी रु. ५.५४ कोटी
श्रीकृष्‍ण आर्थिक विकास महामंडळ (गवळी समाजाकरीता) शासन निर्णय क्र.महामं २०२४/प्र.क्र.५२/महामंडळे, दि.०४/०३/२०२५ दि.३०/०५/२०२५ रु. 50 कोटी ०० रु. 5.०0 कोटी
ब्रम्‍हलीन आचार्य दिव्‍यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (लोहार समाजाकरीता) शासन निर्णय क्र.महामं २०२४/प्र.क्र.७३/महामंडळे, दि.०४/०३/२०२५ दि.३०/०५/२०२५ रु. 50 कोटी ०० रु. 5.०0 कोटी
विकणर समाज आर्थिक विकास महामंडळ (विणकर समाजाकरीता) शासन निर्णय क्र.महामं २०२४/प्र.क्र.२४/महामंडळे, दि.०४/०३/२०२५ दि.३०/०५/२०२५ रु. 50 कोटी ०० रु. 5.०0 कोटी
श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ (नाथपंथीय समाजाकरीता) शासन निर्णय क्र.महामं २०२४/प्र.क्र.८०/महामंडळे, दि.०४/०३/२०२५ दि.०४/०८/२०२५ रु. 50 कोटी ०० रु. 5.०0 कोटी
एकूण ३००.०० कोटी ८.९२ कोटी ३१.०८ कोटी

संचालक मंडळाबाबत

वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळाच्या संचालक मंडळात एकूण ०९ सदस्य असून त्यामध्ये ६ शासकीय सदस्य व ३ अशासकीय सदस्य आहेत.

महामंडळाची प्रशासकीय संरचना

महामंडळाचे प्रशासकीय नियंत्रण शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे आहे. महामंडळाच्या कार्यनियमावलीनुसार मा.अध्यक्ष व संचालक मंडळाची नियुक्ती शासनातर्फे केली जाते. तसेच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्तीही शासनातर्फे करण्यात येते.

महामंडळाचे नोंदणीकृत मुख्यालय जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड क्र.९, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई ४०००४९ येथे आहे.

महामंडळाची स्‍थापना झालेपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महामंडळाची स्वतंत्र कार्यालये कार्यान्वित झालेली आहेत. महामंडळाची स्वत:ची वेबसाईट असून, सदर वेबसाईटवर महामंडळाच्या स्थापनेपासूनची सर्व माहिती तसेच महामंडळ राबवित असलेल्या सर्व योजनांची माहिती व कर्ज मागणी अर्जाचे नमुने उपलब्ध आहेत. सर्व उपकंपनींकरीता स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे.

मुख्यालय, प्रादेशिक व जिल्हा कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी वर्गाचा तपशील

अ.क्र. पदनाम मंजूर पदे कार्यरत अधिकारी / कर्मचारी रिक्त पदे
1व्यवस्थापकीय संचालक1प्रतिनियुक्‍तीने1
2महाव्यवस्थापक2-2
3व्‍यवस्‍थापक (प्रशासन व कर्मचारी)110
4व्‍यवस्‍थापक (वित्‍त व लेखा)1-1
5प्रादेशिक व्‍यवस्‍थापक651
6सहाय्यक व्‍यवस्‍थापक (प्र.व.क.)1-1
7सहाय्यक व्‍यवस्‍थापक (वित्‍त व लेखा)1-1
8सहाय्यक व्‍यवस्‍थापक (प्रकल्‍प)1-1
9जिल्‍हा व्‍यवस्‍थापक32725
10व्‍यवस्‍थापकीय संचालकाचे स्‍वीय सहाय्यक (स्‍टेनो मराठी)1-1
11माहिती तंत्रज्ञ110
12गृहसहाय्यक110
     Sponsored by Kotak Mahindra Bank  |  Developed by Geeta Infotech India Pvt Ltd
© 2025 वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ Privacy Policy  |  Site Map